ARTICLES

गंधर्वरंग 

पं. मुकुल शिवपुत्र हे असे गायक आहेत ज्यांच्या मैफलीची बातमी कळताच लोकं आपले पुढील तीन आठवड्यांचे कॅलेंडर आणि प्लॅन त्या भोवती आखतात. आणि एकदा असा प्लॅन आखला की सुरू होते 'काऊंटडाऊन.' आपण एका अविस्मरणीय मैफलीच साक्षीदार होणार आहोत हे श्रोत्यांना आधीच लक्षात येते. मनात फर्माईशी, इच्छा आकार घेऊ लागतात. संध्याकाळची मैफल म्हणजे अमुक राग गायला जाईल का? निर्गुणी भजन? आणि शेवटी प्रत्यक्ष व्यक्त व्हायचा दिवस उजाडतो.

रविवार २४ मार्च रोजी संध्याकाळी ५ वाजता जुहू, मुंबई येथे अशीच एक मैफल सुरू झाली. निमित्त होते 'सबअर्बन म्युझिक सर्कल' या प्रतिष्ठित संस्थेचा ८२ वा वर्धापनदिन आणि दुसऱ्या दिवशी (२५ मार्च) पं. मुकुल शिवपुत्र यांचा वाढदिवस. सौ चेतना आणि श्री प्रवीण कडले यांच्या ऋत्विक फाउंडेशनने ही मेजवानी रसिकांना दिली. जवळ जवळ चार तास उत्तरोत्तर खुलत गेलेल्या या मैफलीचे वर्णन करायला हा लेख अपुरा पडेल ! अविस्मरणीय वगैरे शब्द हे केवळ मनातल्या भावना मांडायला शाब्दिक आधार!

प्रत्येक मैफलीत असे काही क्षण असतात जे आपला पुढचा रस्ता किती सुखकर असणार आहे याची खात्री पटवतात. पंडितजींनी सुरुवात राग 'पुरीया धनश्री' ने केली. भरीव, गोलाकार तानपुरे आणि त्यात सुरुवातीची आलापी. त्यात पंडितजींनी 'पंचम' स्वर असा काही लावला, आणि तो त्या तंबोऱ्यांमध्ये असा काही बेमालूम मिसळला की सर्व श्रोत्यांनी एकदम 'वाह!' अशी दाद दिली. 'बल गयी ज्योत' या बडा ख्यालात श्रोत्यांना आलापी, सरगम, लयकारी, ताना हे सर्वच ऐकायला मिळाले. त्यानंतर द्रुत बंदिश मात्र 'गौरी बसंत' या रागात प्रस्तुत झाली. त्यानंतर बसंतच्या तराण्याणे मैफल थिरकू लागली. पंडितजींच्या गायकीचे हे एक वैशिष्ट्य म्हणावे लागेल. पुरीया धनश्री आणि गौरी बसंत हे वेगळ्या 'मूड' चे राग आहेत. मात्र या 'मुड्स' मधून पंडितजी अगदी सहज प्रवास करतात आणि आपल्याला देखील तो प्रवास घडवतात. हाच अनुभव पुढे राग झिंझोटीच्या अंगाने सादर केलेल्या राग खंबावती द्वारे श्रोत्यांना आला. 'सखी मुखचंद्र छबी जबही निहारी ' ही विलंबित रूपक तालातीत बंदिश आणि त्यानंतर झिंझोटी रागातील प्रसिद्ध पारंपरिक बंदिश 'अखियां उनसो लागी' यांनी वेगळाच रंग भरला! ही उस्ताद फैय्याज खाँ साहेबांची रचना आहे. लयकारी आणि सरगम करताना 'नी (कोमल) ध सा' या स्वरसंगतीवर अलगद कोसळणे या सगळ्यामुळे मुकुलजींनी एक वेगळी शैली लोकांसमोर सिद्ध केली.

एरवी मुकुलजींच्या जवळजवळ सर्व मैफलींमध्ये 'निर्गुणी' भजनाची फर्माईश होत असते. मात्र झिंझोटी नंतर पंडितजींनी स्वतःच जाहीर केले की ते निर्गुणी भजन गाणार आहेत. टाळ्यांच्या कडकडाटात 'युगन युगन हम योगी ' हे कबीर भजन सादर झाले. त्यानंतर एक सूफी संतकवी मौजीसाहब यांचे एक निर्गुणी भजन सादर झाले. " पहले करू परनाम, सीस सतगुरु को नमाउ " आणि मध्यांतर घोषित झाले.

संगीत या व्यतिरिक्त अनेक क्षेत्रांमध्ये पंडितजींच्या गाण्याचे चाहते आहेत. कालच्या मैफलीत सुप्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे हे आवर्जून आले होते. मध्यंतरात त्यांनी पंडितजीं बरोबर चहापान केले आणि नंतर शेवटपर्यंत बसून गाण्याचा आस्वाद घेतला.

'होली खेलन कैसे जाऊ' या पिलू रागातील होरी-ठुमरीने दुसरे सत्र सुरू झाले. स्वरांचा अलगद लगाव हे या सादरीकरणाचे वैशिष्ट्य! विशेष म्हणजे पंडितजी गंधार या स्वराचा उपयोग इतक्या प्रभावीपणे करत होते की श्रोते अगदी मनापासून दाद देत होते. पुढे सादर झाली 'चलो सखी खेले, कन्हैय्या संग होरी' ही रचना. पंडित कुमार गंधर्व यांनी ही रचना एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवली आहेच. केहेरवा तालात ही रचना सादर होताना पंडितजींच्या गाण्यातील अभिनय श्रोत्यांना अनुभवता आला. 'चलो सखी' हा गोड आग्रह एखादी स्त्री कशा पद्धतीने करेल हे काल सर्वांनी गाण्यातून अनुभवले. "हर साल होली के समय पिताजी की बहुत याद आती हैं l " या पंडितजींच्या वाक्याने सर्वांना एक वेगळेच समाधान दिले.

"अब हम पं. वसंतराव देशपांडेजी को याद करेंगे " असं म्हणत पंडितजींनी मैफलीची सांगता 'आज मै लडूंगी गुंय्या " या भैरवी दादरा ने केली. ९ च्या सुमारास संपन्न झालेल्या या मैफलीत श्रोत्यांनी अनेक रचना अनुभवल्या. "राग संगीत ही स्वरांची भाषा आहे आणि ती ऐकून ऐकून समजू लागते. देशभर अनेक ठिकाणी कार्यक्रम होऊन देखील महाराष्ट्रात या 'भाषेची' समज सर्वाधिक आहे आणि म्हणून मला महाराष्ट्रात गायन सादर करायला आवडतं " असं पंडितजी शेवटी म्हणाले. आणि टाळ्यांच्या प्रदीर्घ कडकडाटाने एका अविस्मरणीय मैफलीची सांगता झाली.

या मैफलीत रक्षानंद पांचाळ यांची उत्कृष्ट तबलासाथ केली. ज्ञानेश्वर सोनवणे या तरुण कलाकाराची प्रभावी आणि उत्कृष्ट संवादिनी संगत पंडितजींना लाभली. श्रोत्यांनी देखील योग्य जागांवर दाद देऊन सोनावणे यांच्या कौशल्याची दखल घेतली.
तानपुरे जयंत नायडू यांच्या हातात असतात तेव्हा मैफलीत एक आश्वासक सूर गूँजत रहातो. सुरुवातीला सबर्बन म्युझिक सर्कलचे सचिव गौरांग नूलकर आणि गंधर्वसभेच्या सचिव प्रिया आचरेकर यांनी उपस्थित रसिकांचं स्वागत केलं. प्रवीण कडले यांच्या आभारप्रदर्शनाने सांगता झाली. मुकुलजीँच्या त्रेसष्ठाव्या वाढदिवसानिमित्त पेढा देऊन आधीच गोड झालेलं रसिकांचं तोंड अधिक गोड करण्यात आलं.

या मैफिलीला जाणकार श्रोत्यांची तुडुंब उपस्थिति होती. त्यात गंधर्वसभेचे अध्यक्ष प्रवीण कानविंदे, सौ. ऋजुता कानविंदे, प्रवीण कडले, सौ. चेतना कडले, पॉप्युलर प्रकाशनचे मालक संपादक रामदास भटकळ, ह्रिदयेश आर्टस् चे अविनाश प्रभावळकर, उद्योगपति दुर्गेश चंदावरकर, तसेच सबर्बन म्युझिक सर्कल, गंधर्वसभा व ऋत्विक फाउंडेशन या तिन्ही संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
( प्रसिद्धीसाठी : गंधर्वसभा. शब्दांकन : आशय गुणे )

पंडित मुकुल शिवपुत्र - मैफल - हृदयेश आर्टस् म्युजिक फेस्टिवल, जानेवारी २०१८

मुंबईत थंडीची चाहूल लागली की तमाम संगीत रसिकांना एक अनामिक हुरहूर लागते ती पार्ले टिळक विद्यालयाच्या ग्राउंडवर दरवर्षी संक्रांतीच्या शुभ पर्वात साजरा होणाऱ्या संगीत महोत्सवाची. हृदयेश आर्टस् च्या या संगीत महोत्सवात देशातले मोठमोठे कलाकार आपले कलाविष्कार सादर करतात. हृदयेशच्या व्यासपीठावर कलाकार इतर कोणत्याही व्यासपीठाहून अधिक खुलतात हाही गेल्या अठ्ठाविस वर्षांतला अनुभव आहे. संस्थेचे सर्वेसर्वा अविनाश प्रभावळकर यांचं कलाकारांशी सौहार्दाने वागणं हे त्याचं प्रमुख कारण असावं. ते निमंत्रित कलाकारांचा योग्य मान ठेवतात आणि त्याचं प्रतिबिंब कलाकाराच्या सादरीकरणात दिसून येतं. गेल्या सलग दोन वर्षांतलं पं. मुकुल शिवपुत्र यांचं या व्यासपीठावरचं गाणं हे याचं मोठ्ठ उदाहरण म्हणता येईल.


एखाद्या शास्त्रीय संगीताच्या मैफलीचे साफल्य कोणत्या निकषावर अधोरेखित होतं? कलाकाराने घेतलेल्या ताना अगर सरगम मुळे? उपस्थित श्रोत्यांच्या टाळ्यांमुळे? की त्यांच्या जाणकारीमुळे ? मला वाटतं की ह्या साऱ्याच्या पलीकडे एक मनःस्थिती निर्माण होते आणि ती म्हणजे मैफल संपल्यावर निर्माण होणाऱ्या एका अनामिक अस्वस्थतेची! 'मैफल सुरु राहावी, संपूच नये ' असं जेव्हा समोर बसलेल्या प्रत्येक श्रोत्याला वाटतं तेव्हा त्या मैफलीचा परिणाम सर्वाधिक झालेला असतो. अशा वेळेस श्रोते स्वतःच्या स्थानावरून उठत नाहीत, 'भैरवी' झाल्या नंतर देखील दहा मिनिटे तसेच बसून राहतात आणि मनातल्या मनात स्वतःची समजूत काढतात, 'नाही, अजून काहीतरी सादर होईल, उठू नकोस!'

रविवार दिनांक १४ जानेवारी रोजी 'पार्ले टिळक' विद्यालयाच्या मैदानात पंडित मुकुल शिवपुत्र ह्यांच्या मैफलीत नेमका हाच अनुभव सर्व श्रोत्यांना आला.

सकाळच्या मैफलींची संख्या कमी होत असल्यामुळे आणि प्रातःकालीन राग तुलनेने कमी गायले वाजविले जात असल्याच्या पार्श्वभूमीवर हृदयेश आयोजित मुकुलजींची सकाळची मैफल ही रसिकांना पर्वणीच होती. त्यामुळे श्रोत्यांची उपस्थिती देखील लक्षणीय होती.

मैफलीची सुरुवात लोकप्रिय राग तोडी ने झाली. ज्यात मुकुलजींनी बडा ख्याल -"जा जा रे मोरा पातकवा...." छोटा ख्याल - " लंगर कांकरिया जिन मारो" आणि नंतर एक तराणा सादर केला. तोडीचे स्वर एक प्रसन्नता घेऊन येतात आणि त्या प्रसन्न स्वरांच्या आकाशात सकाळचा पहिला प्रकाश अनुभवण्यातली सुंदरता त्या दिवशी तिथे उपस्थित रसिकच जाणोत !

जितका प्रभावी तोडी, तितकाच आणि सहज प्रभावी पुढे आलेला 'खट.' हा राग मूळात काही रागांचा परिपाक आणि त्यामुळे ह्या रागाचे यशस्वी सादरीकरण म्हणजेच ह्या विशिष्ट रागांमध्ये लीलया केलेला वावर! मात्र, असं वावरताना कलाकाराला ह्याचे भान ठेवावे लागते की ज्या विशिष्ट रागांचा परिपाक हा राग आहे, त्यांचे स्वतंत्र रूप इथे दिसता कामा नये. आणि ही रागमाला देखील नाही. कारण रागमाला सादर करताना कलाकाराला अनेक रांगांमध्ये शिरकाव करण्याचे स्वातंत्र्य असते. मुकुलजींनी गायलेल्या 'खट' "आयी अंबुवा..." मध्ये राग जौनपूरीचे अंग विशेष होते - हा राग ह्या सर्व अर्थाने सरस आणि अविस्मरणीय ठरला !

त्याच बरोबर त्याच्या पुढे गायलेली 'रामकली' रागातील बंदिश -" कलियन सोहायो री..." देखील प्रचंड मोठा प्रभाव पाडून गेली.

परंतु माझ्यासाठी सर्वात अविस्मरणीय सादरीकरण (खूप अवघड आहे निवडणं, पण तरीही) होतं ते पुढे गायलेल्या 'देस-तिलंग' ह्या रागातील टप्याचे! टप्पा हा एक विलक्षण गान-प्रकार आहे आणि त्याच्या स्वभावामुळे त्याला निभावणे बरेच कठीण आहे. त्यातून, 'देस-तिलंग' हा जोड राग असल्यामुळे योग्य जागेवर स्वराचा ठेहराव असणे आणि तो सांभाळत सारी बढत करणे हे अधिक कठीण होऊन जाते! पण मुकुलजींनी स्वरांचा हळुवार, अलगद उपयोग करून असे काही वातावरण उभे केले की ते पुढे अनेक दिवस विसरणं केवळ अशक्य! विशेष म्हणजे मनावर मोरपीस फिरवल्या सारखं वाटावं तसं त्यांचं ते समेवर येणं ! पटांगणातला श्रोत्यांचा महासागर अगदी गारूड पडल्यागत खिळला होता. आणि म्हणूनच टप्पा संपल्यावर अचानक 'भैरवी' चे सूर ऐकू येऊ लागले तेव्हा श्रोत्यांमध्ये अस्वस्थता पसरली. "हे काय, संपलं?" अशाप्रकारची वाक्य आजूबाजूला ऐकू येऊ लागली. 'भैरवी'चे इतके सुंदर सादरीकरण होऊन सुद्धा, ह्या नंतर मैफल संपणार, हा विचार कुणालाही सहन होत नव्हता! कदाचित भैरवी नंतर मध्यंतर असेल, आणि आपण पुन्हा मुकुलजींना ऐकू अशी वेडी आशा निर्माण झाली होती . परंतु तसे काही झाले नाही आणि मैफल संपली. चक्क दहा मिनिटे खुर्च्यांवर मूर्तिवत बसून राहून एक सामूहिक दाद श्रोत्यांनी मुकुलजींना दिली.

ह्या मैफलीला जे श्रोते अगदी सुरुवातीपासून आले होते त्यांना मुकुलजींना तानपुरे जुळवताना पाहता आले. ह्या भाग्यवान श्रोत्यांच्या यादीत मी माझे नाव देखील समाविष्ट करतो. तानपुरे हा तो कॅनवास असतो ज्याच्यावर कलाकार सुरांच्या रंगांनी रागाचे चित्र उभे करतो. ह्या जगात बऱ्याच प्रकारचे आवाज आहेत. आणि या कल्लोळातून सांगीतिक नाद त्या तानपुऱ्यावर ट्यून करणे हे सर्वात मोठे आव्हान असते. अनेक वेळा असे होते की तानपुरे जुळविल्या नंतर किंवा जुळवले जात असताना निवेदन सुरु असते, कलाकारांचे स्वागत होते आणि श्रोत्यांचे बोलणे किंवा टाळ्या वाजविणे देखील ऐकायला मिळते. त्यामुळे ज्या कॅनव्हास वर पुढची मैफल उभी राहणार असते त्याची जाणीव श्रोत्यांना होत नाही. मुकुलजींच्या मैफलीत सुरुवातीचे निवेदन झाल्यावर पुढे दहा मिनिटे व्यासपीठावर शांतता होती आणि केवळ तानपुरेच वाजत राहिले. त्यामुळे श्रोते प्रसन्नता आणि शांतता अनुभवू शकले. रोजच्या घाई- गडबडीच्या जीवनात असे क्षण अनुभवणे आपण विसरून गेलो आहोत का ? ही मैफल ह्या कारणासाठी देखील महत्वाची ठरली.

शास्त्रीय संगीत ही सूरांची भाषा आहे आणि कलाकार हा श्रोत्यांशी ह्याच भाषेत संवाद करीत असतो. ज्ञानेश्वरांच्या भाषेत सांगायचे झाले तर, 'ह्या हृदयीचे त्या हृदयी घातले' ह्याचा अनुभव मैफलीत होत असतो. मुकुलजींच्या संगीतात नेमकी ह्याचीच अनुभूती प्राप्त होते. श्रोत्यांमध्ये असे अनेक असतात ज्यांना संगीतातले व्याकरण समजत नाही. बऱ्याच लोकांना तर राग-रागिणींची नावे देखील माहिती नसतात. प्रत्येक श्रोत्यांची पार्श्वभूमी देखील वेगळी असते. त्यामुळे सर्वांना एका जागेवर बसवून, खिळवून ठेवणे आणि सर्वांच्या मनावरून काळाचे ओझे दूर करणे ही किमया एक नायकच करू शकतो! मुकुल शिवपुत्र हे असे नायक आहेत. कारण, काळ इथेच थबकावा, हे क्षण पुढे जाऊच नयेत, असं वाटण म्हणजे खरं गाणं. आणि हे त्या दिवशी तिथे उपस्थित सर्वांना वाटले म्हणून तर सगळे श्रोते भैरवी होऊन देखील जवळ-जवळ दहा मिनिटे आपल्या खुर्च्यांवरून उठले नाहीत. कारण, त्यांचे मन त्यांना उठू देत नव्हते!

हे सूर आता आपल्या बरोबर रहातील . कुणाला मध्येच 'तोडी' मधली एखादी तान आठवेल किंवा कुणीतरी त्या टप्प्याची लय आठवून हळूच डोलेल. आणि आपण सर्व मुकुलजींच्या पुढच्या मैफलीची उत्सुकतेने वाट बघू, पुन्हा त्याच अवस्थेतून जाण्यासाठी! आपल्यापैकी बऱ्याच लोकांना ह्याची आता सवय झाली असेल, नाही का?

शेवटी मुकुलजीनी श्रोत्यांना समजावले "अब विदा लेते है... मुलाकाते तो होती रहती है l " तरीही श्रोते ऐकेनात. तेव्हा मुकुलजी म्हणाले - " ये जो राग रागिनी होते है ये लोग गंधर्वलोक मे वापस चले जाते है l उन्हे वापस बुलाने के लिये बड़ी तपस्या करनी पड़ती है l..... खैर हमारे बुलावे पर वो आते है यही हमारा सौभाग्य है.....?" एका सर्वश्रेष्ठ कलाकाराची कलेकडे पाहण्याची ही नजरच त्याला श्रेष्ठत्व बहाल करते. शेवटी भानावर आलेल्या श्रोत्यांनी त्या अद्वितीय गायकाला स्टेंडिंग ओव्हेशन दिलं. एकूणच पं. मुकुल शिवपुत्र यांचा हा परफॉर्मन्स म्हणजे गेल्या काही वर्षांत घडलेल्या सर्व सांगीतिक कार्यक्रमांचा कळसाध्याय होता.

-आशय गुणे

कुमारांचा सुकुमार! - classical music concert - Maharashtra Times -

Newspaper Link

THE MASTER RETURNS

Last week saw a very special occasion for admirers of Hindustani classical vocalist Pt Mukul Shivputra. His concert had been announced after a long gap and there was an unspoken question in everybody’s mind. Would he sing or wouldn’t he? Would he stay the course or leave midway?
Would he react adversely to someone’s face and refuse to sing? Would he even put in an appearance? Or having done so, would he go away before entering the concert hall and not return?
Many such incidents had marked the erratic performing life of this amazing vocalist, and people were naturally apprehensive. Pt Shivputra, son of Pt Kumar Gandharva, left home in his twenties to live as a recluse in a math on the banks of the Narmada.
With the math as his base, he wandered all over the country, making it extremely difficult for concert organisers to locate him.
Worse, he became addicted to alcohol. Shivputra's friends, at whose homes he would turn up out of the blue, looked in vain for answers to his condition.
Had his mother’s death when he was still young, and his wife’s death later, knocked the bottom out of his world?
Had the burden of being the son of one of the most original musical geniuses of our times added to his psychological stress?
Or was it some neurological disorder that was driving him to destroy himself? Three years ago a distressing news item appeared in the press. Shivputra had been spotted, unwashed and dishevelled, begging for money outside a temple in Bhopal. The Madhya Pradesh government offered to rehabilitate and look after him. But that hadn’t worked.
Recently, however, someone whose family had had a close association with Pt Kumar Gandharva, had taken him under her wing, and that seemed to have helped. On Sunday we heard the newly rehabilitated Pt Shivputra in full form, singing brilliantly before a house that was packed with his admirers.
He began his first bada khayal in Puriya Dhanashree with an extended nom tom, followed by two beautiful bandishes composed by his father.
The vilambit, Bal Gayee Jyot, was a deeply sombre composition. Pt Shivputra has a strong, pure, pliant voice which he modulates skilfully to add depth to his music and to emphasise the mood and meaning of the words. In this bandish, each time he hit the high note at the end of the first line, it shook you. It was like a call from the wild.
The drut bandish, Kahan Chala Re Piya came as a playful contrast to the first. The singer rendered it teasingly, his resonant voice exulting in the twists and turns of the composition which melds note and word so perfectly that you wonder which came first.
Next, switching moods again, he sang Guruji Jahan Baithu Wahan Chhaya Re, beginning by elaborating the second and third words before coming to the first. When he did utter ‘Guruji’, his voice was filled with such humility, that you were moved to tears.
After the interval, Pt Shivputra sang Bageshree, and at once you realised there was something going on here that was hard to comprehend. Whereas the bada khayal in Puriya Dhanashree had been built up in the conventional architectural manner, block by block, his approach here was to build through a scattering of fragments. What he did before the nom tom was to sing squiggles of swara patterns in which you caught brief glimpses of Bageshree’s face.
This created an environment of musical suggestions which he then coalesced into the full figure of the raga. Was he searching for a new route into the raga, or deconstructing the melody to break our preconceived notions of it to enable us to see it differently?
Whatever he was trying to do, the effect was both fascinating and disconcerting. The finalé of the recital was an emotionally nuanced rendering of Kabir’s Dhun Sunke Manawa Magan Huva in Bhairavi.
At the end of the recital, one was so grateful that this hugely gifted singer had managed to escape his father’s shadow and find his own voice. Kumarji was a genius, a pathfinder. Many of his disciples have been happy emulating the superficial elements of his style. Not Pt Shivputra.
He has understood the essence of his father’s music, and sought and found his own truth within it. Now that he is back amongst us, let us hope that he will sing us that truth more often than he has done in the past.
--
SHANTA GOKHALE
Nov 5, 2012, 07.32 AM

A Supreme Rendition

Only three kinds of response were possible to Pt Mukul Shivputra's presentation of Yaman on Friday at the Nehru Centre, on the second day of the Swaranjali festival. The first could be total befuddlement laced with awe. Was this Yaman? Was this method of delineating it supposed to appeal to the listener? Must ask one of those all-knowing critics who have made Pt Shivputra a cult figure.
The second response could come from the opposite end. This was no Yaman. I know my Yaman well. And this was no way to delineate and develop a raga. I know how it is done. He simply couldn't get it right, could he? Why do so-called connoisseurs call him a great vocalist?
The third response could be something in between, befuddled but not outright dismissive, and based firmly on the established fact of Pt Shivputra's unique talent. Also on evidence, if evidence were required, on his conventionally magnificent rendering of the same Yaman bandish, "Salona re balam mora" on other occasions, at least one of which is available on YouTube.
That leaves us with three possible explanations for his strange performance. Erratic temperament, failure of some internal mechanism resulting in loss of access to knowledge and experience, bad voice. If the former two, there's nothing further to be said. Some artists, like some human beings, are temperamental; and the loss of access to knowledge and experience is a medical, not a musical problem.
Let's look at the third possibility. Bad voice. Yes, there was much coughing and hawking. But the same bad voice didn't stand in the way of Pt Shivputra presenting a powerful Kafi tappa, "O miya jaanewale" later. One also recalls his Bageshree at Karnataka Sangh two months ago, when his voice was not a problem but his treatment was very much of a piece with Friday's treatment of Yaman. In both he was rejecting the conventional method of building up a raga through the bandish, architecturally, step by step, towards an ultimate whole.
One way or another, one couldn't escape the notion that he was making a deliberate attempt at deconstructing the melody, denying it its coherence, and the very aim of building it into a majestically towering structure. But some kind of a structure, whatever its form, surely had to be the purpose of that piece of music. Speculating, but not idly, on the impulse that lay behind his "Salona re balam mora", one might look at what has happened in the other arts.
In literature, the idea of character, plot and event as the very foundation of fiction has been overturned by novelists to open up opportunities for creating new forms. Dancers have replaced grace and beauty with stern intensity to segue with the jagged angularities of contemporary life. Cinema has denied conventions of narrative structure, dialogue and the centrality of the chief protagonist's image. Theatre has dislodged the well-made play where the audience identifies emotionally with characters and situations, and forged new forms in which the audience is not expected to suspend disbelief, but rather to be acutely aware of the fact that the actors are actors and not the characters they are playing. Readers, viewers and critics protested vehemently against this deliberate destruction of the old, comfortable formulae in which it had been so easy to say this is bad and this is good or this is us and this is them. Eventually, however, they were forced to admit that the new forms were not only valid, but valid in a way that was in sync with the world in which we were living. Ultimately the works of these experimenters became signposts to roads less taken, because, having broken old rules, they had created forms that held in new ways. The work of the Spanish architect Antoni Gaudi is an example of how the most outlandish (at first sight) structures, finally convinced critics that these too were legitimate ways to design and build buIldings. Pt Mukul Shivputra has not managed to rebuild yet. He has attempted to break old
structures but has not been able to reassemble the bits and pieces into a self-sufficient new form. In a culture that resists change and continues to give us sublime music in the old forms, an attempt to break away, even if it fails, should make us sit up and listen. Pt Shivputra's lineage and his unique art might lead him to something genuinely new. Question is, does he have the discipline to carry it through?
--
Shanta Gokhale
9th January 2013

सुकन्या स्वगृही

खूप खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे ही. एक आटपाट नगर होतं. तिथे राजा रामेश्वार राज्य करीत असे. प्रत्यक्ष ईश्वाराचंच राज्य ते. राज्यात सुकाळ होता. प्रजा सुखात नांदत होती. राजा रामेश्वार कलासक्त होता. साक्षात नटराजच तो. स्थानिक प्रजाजन कलानिपुण होते. कलोपासनेलाच ते रामेश्वाराची सेवा मानत होते. रामेश्वाराच्या सुंदर मंदिराच्या विस्तीर्ण प्रांगणात भव्य सभामंडपात अहोरात्र विविध कलाविष्कार सादर होत असत. वर्षानुवर्षे ही परंपरा चालूच होती. परिसरातली लहान लहान मुलंही मोठ्यांचं अनुकरण करून अभिनय, नृत्य, संगीत, चित्रकला, मूर्तिकला, लेखन यात पारंगत होत होती.

READ MORE

Maestro on the peak -

It was third consecutive concert by Pt. Mukul Shivputra. For the third time, Pt. Mukul Shivputra took us all along with him on the highest peaks of musical contemplation.
This concert of Pt. Mukul Shivputra was organized by Vriddha Anand Ashram, a home for old age people in Akurdi, near Pune city. Program was free of cost for all the music lovers. Though Akurdi is far away from my place, I decided to attend the concert because each and every concert of Pt. Mukul Shivputra is an elevating experience.
After listening to three concerts by Pt. Mukul Shivputra, one can feel the divinity of this man if one listens with open eyes. Mukul Shivputra has a rare sense of notes, rhythm, dialog between the notes. His compositions are also very well chosen. He knows exact locations of all the notes. All the above mentioned things can be acquired through tremendous hard work and dedication; but Pt. Mukul Shivputra goes beyond this. His music has an out of world serenity, out of human reach contemplation and out of mind vision.As I was pretty before time, I got a sit very near to the stage. Pt. Mukul Shivputra started his performance at around nine in the night. For next three hours, all of us were in a different world, far beyond the ordinary course of life. Sound system was not up to the mark. But, Pt. Mukul Shivputra was beyond all the technical problems and realities. The journey which started from Raga Savani went away to Bhairav covering Savni Nat, Bihag, Nirguni Bhajan and beautiful composition by saint Tulsidas. All the three concerts which I have attended by Pt. Mukul Shivputra firmly assert that he is most precious pillars of Indian Vocal Music today.
Pt. Mukul Shivputra will be performing tomorrow at Tilak Smarak Mandir in Pune. Going there to feel the maestro on the peak.

--

Mandar Karanjkar
2012

उत्कट स्वरानुभूति

मुंबईत हृदयेश आर्ट्स फेस्टिव्हलमध्ये गायक पं. मुकुल शिवपुत्र यांची नुकतीच एक संस्मरणीय मैफल झाली. तिचा रिपोर्ताज्..
सकाळी उठलो तेव्हा आदल्या दिवशी ज्या बंदिशीने मैफल संपली तिची चाल मनात कुठेतरी घोळत होती. नंतर त्या रात्री गायलेल्या इतरही रागांची आठवण आली. परंतु ही आठवण नुसतीच त्या रागांची अथवा बंदिशींची नव्हती; त्याबरोबर ते वातावरणदेखील मनात घर करून बसले होते. त्या भारलेल्या वातावरणात मैफलीतले सुरेल तानपुरे आणि त्यांनी निर्माण केलेला भारदस्तपणा, तबल्याच्या ठेक्याचा तो अलगद आघात आणि मुख्य म्हणजे कलाकाराचा सच्चा सूर यांचा अंतर्भाव होता. ते सूर आणि एकूणच ते वातावरण तितकेच व्याकूळदेखील करत होते! ही मैफल होती पं. मुकुल शिवपुत्र यांची. पार्ल्याच्या ‘हृदयेश आर्ट्स फेस्टिव्हल’मध्ये योजिलेली.
काल ते रात्री ९:१५ ची वेळ असून सुद्धा संध्याकळी ७ पासून ग्रीन-रूम मध्ये उपस्थित होते. पार्ल्यात पहिल्यांदाच त्यांचा कार्यक्रम होणार होता म्हणून ते खूप प्रसन्न होते असं देखील निवेदकांनी सांगितले. हो, जवळ जवळ १० वर्षांपूर्वी त्यांचे गाणे ह्याच ठिकाणी, ह्याच महोत्सवात होणार होते. मी ही आतुरतेने वाट बघत होतो. पण त्या वेळेस योग नव्हता. शेवटी इथे त्यांना ऐकायचा योग काल आला! मला दिल्लीला जायचं असल्यामुळे हा कार्यक्रम ऐकायला मिळेल का हे नक्की नव्हतं. मात्र 'पास' ची सोय झाली होती. शेवटी कळलं की दिल्लीला दुसऱ्या दिवशी जायचं आहे. मग ही संधी कोण सोडेल? जवळ जवळ आठवडा आधीपासून मनातल्या मनात फार्माइशी सुरु झाल्या. सर्वाधिक इच्छा 'राजन अब तो आ जा रे' ची होती. पण जेव्हा काल 'शंकरा' ची घोषणा झाली तेव्हा तितकेच प्रसन्न वाटले
मुकुलजींनी गाण्याची सुरुवात राग शंकराने केली. जेव्हा या रागाची घोषणा झाली तेव्हा साहजिकच दोन कारणांमुळे अतिशय आनंद झाला. एक म्हणजे पं. कुमार गंधर्व यांनी या रागाला एका विशिष्ट उंचीवर नेऊन ठेवले आहे, त्याची आठवण झाली. आणि दुसरे म्हणजे हा राग एकूण हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या मैफलींमध्ये फारसा ऐकायला मिळत नाही. कुमारजींची आठवण होणे जरी साहजिक असले, तरी मुकुलजींचे गाणे एका स्वतंत्र ढंगाने ऐकले गेले पाहिजे. तर- असे काय आहे या गाण्यामध्ये- जे इतके दिवस आपल्या मनात रुंजी घालत राहते?
मुकुलजींचे गाणे खूप आक्रमक नाही. त्यात ना प्रचंड सरगम आहे, ना तानांच्या करामती! पांडित्य दाखवणारी अति धिम्या गतीची आलापीदेखील नाही. लयीच्या कसरतीही नाहीत. पण तरीही त्यांचे गाणे सर्वसमावेशक आहे. याचे कारण- त्यातला ‘सूर’! आणि हा केवळ गायनाचा सूर नाही, तर तो मैफलीतील प्रत्येक तानपुऱ्याचा सूर आहे. तानपुरा आपल्या मनात असलेल्या, साठवलेल्या सुराशी जुळवून घायचा असतो. त्यामुळे मनातील नैसर्गिक सूर जितका प्रभावशाली, तितके त्या सुराशी जुळवून घेतलेले तानपुरेही! तानपुऱ्यांवरच संपूर्ण मैफल उभी राहते. ‘तानपुरे हे माझा कॅनव्हास आहेत,’ असे कुमारजी म्हणायचे. ‘माझे सूर त्यावर रंग भरतात,’ हा त्यांचा विचार होता. त्याची प्रचीती या मैफिलीत आली. गाणे सुरू होण्याआधी दोन मिनिटे तानपुरे वाजत राहिले तेव्हाच खात्री पटली.. आज काहीतरी ग्रेट घडणार! मुकुलजींच्या गाण्यात उत्तर हिंदुस्थानी ख्याल, धृपद संगीत आणि दक्षिण हिंदुस्थानी कर्नाटकी संगीताचाही समावेश असतो. त्यामुळे या विभागांच्या पलीकडे जाऊन ते ‘संगीत’ सादर करतात!
‘शंकरा’ची सुरुवात ‘सो जानू रे जा’ या पारंपरिक बडा ख्यालाने झाली. टय़ून केलेले तानपुरे आणि त्यात अचूक मिसळणारा नैसर्गिक आवाज, प्रत्येक सुराला न्याय देत हळुवारपणे रागाची केलेली बढत ही या सादरीकरणाची वैशिष्टय़े ठरली. आपल्या रागसंगीतात सुरांच्या ‘टायमिंग’ला प्रचंड महत्त्व आहे. ‘मारवा’ आणि ‘पुरिया’ या रागांमध्ये अगदी तेच स्वर आहेत; परंतु एखाद्या स्वरावर जास्त भर दिला की राग बदलतो. हा अतिशय सूक्ष्म फरक आहे. प्रत्येक कलाकार या ‘टायमिंग’च्या मागे असतो. स्वरसंगीताचा खरा अनुभव घ्यायचा असेल तर हे ‘टायमिंग’ साधता आले पाहिजे. मुकुलजींनी ‘शंकरा’मधल्या ‘सा नी प ग प ग’ या स्वरसंगतीत याच ‘टायमिंग’चा अनुभव रसिकांना दिला. आलाप, तान, नोम-तोमच्या ढंगाने केलेली बढत.. हे सारे होतेच. परंतु कोणता स्वर किती टिकवून ठेवायचा, तो केव्हा सोडायचा, हे इतके अचूक होते, की ‘शंकरा’ने वेगळाच रंग भरला. हा ख्याल संपला आणि अगदी सहजपणे ‘नट बिहागा’त प्रवेश झाला!
‘झन झन झन बाजे’ ही ‘नट बिहाग’मधील बंदिश अनेक गायकांनी गायली आहे. फैयाज खान, मल्लिकार्जुन मन्सूर, एस. डी. बर्मन आणि उल्हास कशाळकर ही या बंदिशीबरोबर जोडली गेलेली काही प्रसिद्ध नावे! पण तरी त्या दिवशीची ही बंदिश ‘मुकुल शिवपुत्र यांचीच’ हे अगदी स्वच्छपणे जाणवले. गायकीवर आणि सुरावर प्रभुत्व असल्याशिवाय हे शक्य नाही. एरवी ज्या लयीत ही बंदिश गायली जाते त्यापेक्षा धिम्या लयीत ते गायले. शिवाय ‘शंकरा’पासून ‘नट बिहाग’मध्ये जाताना ते मध्ये थांबले नाहीत. ‘शंकरा’च्या ख्यालनंतर लगेचच ही बंदिश सुरू झाली. असा राग बदलणे प्रचंड अवघड असते. कारण प्रत्येक राग म्हणजे एक वेगळी प्रकृती असते. असे एकदम वेगळ्या प्रकृतीत प्रवेश करणे हे महान गायकच करू जाणे! त्यानंतर एक सुंदर तराणा सादर झाला आणि पहिले सादरीकरण संपले. शेवटी ‘बसंत’ रागाने वातावरणात बहार आणली. यातील द्रुत बंदिशीने जेव्हा हा राग समाप्त झाला तेव्हा रात्रीचे ११ वाजले होते. पावणेदोन तास कसे गेले, कळलेच नाही. मुकुलजींना सांगण्यात आले, की आता ११ वाजले, थांबायला हवे. त्यावर ते म्हणाले, ‘अरे, मला वाटलं, दहा वाजलेत. आणि अजून अर्धा तास आहे!’ त्यांची ही जी गातानाची अवस्था; तीच रसिकांची ऐकतानाची! वेळ ‘दहा’वरच थांबून राहिली तर किती छान होईल असे वाटत होते.
गाणे सुरू असताना बाहेर कुठल्याशा बिल्डिंगमध्ये जोरजोरात बॅण्ड वाजत होता. मुकुलजी थांबले तेव्हा लोक आग्रह करू लागले. तेव्हा मुकुलजी म्हणाले, ‘अपराध नहीं करना चाहिये. और हम बाहर ढोल बजानेवाले थोडी हैं?’ त्यांच्या या वाक्याने समाजाची सद्य:स्थिती आणि प्राधान्य अधोरेखित झाले! मागे एकदा मुकुल शिवपुत्र म्हणाले होते की, ‘अगर वातावरण में शोर हैं, तो नवनिर्माण नहीं हो सकता..’ त्याची आठवण झाली.
मुकुलजींचे गाणे काहींना चटकन् प्रभावित करीत नाही. परंतु हे सूर्याच्या तेजासारखे आहे- जे सर्वाना सहन होतेच असे नाही. मुकुलजी हे भारतीय संगीताच्या कॅनव्हासवरील सूर्य आहेत! त्यांचे गाणे ऐकण्यासाठी गाणे ऐकण्याचा सराव हवा. एका जागी शांतपणे बसण्याची तयारी हवी. प्रत्येक सूर ऐकण्याची व तो स्वतंत्रपणे आत्मसात करण्याची मानसिकता हवी. गायक व श्रोत्यांमध्ये एक अनामिक संवाद सुरू असतो. बऱ्याचदा दाद देताना हा संवाद ‘बोली’त उतरतो. मुकुलजींचे गाणे ऐकताना हा अनामिक संवाद आनंदाचा उत्कर्षबिंदू गाठतो. कारण त्यांचे गाणे शांती प्रदान करते. म्हणूनच आपण सतत त्या अवस्थेत पुन्हा जायचा प्रयत्न करतो. आपल्याला तो ‘माहोल’ आठवत राहतो आणि आपण अस्वस्थ होतो. अशी अस्वस्थता जो कलाकार प्रदान करू शकतो, तोच खरा नायक! कुमारजी असे नायक होते. त्यांच्या काही रेकॉर्ड्स आपल्याला ही अस्वस्थता देतात. तसेच मुकुलजींचे गाणेही अस्वस्थता आणि एका अनामिक आनंदाची अनुभूती रसिकांना देऊन जाते.
--
आशय गुणे

सुसंवादिनी

खरंच मुकुलजी म्हणजे ज्ञानाचा सागर आहेत. अथांग, अगम, पार, गूढ, अतिगंभीर. गाण्याचा नाद आणि नादाचंच गाणं त्यांच्या ह्रदयाची धडकन् आहे. हरफनमौला हर दिल अझीज असा हा असामान्य गायक, प्रयोगशील संगीतज्ञ म्हणजे परमेश्वराचा एक महत्वकांक्षी प्रोजेक्ट आहे असंच म्हणावंस वाटतं. चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिष्ठाता असलेल्या श्री गणेशजींनी मोठ्या मेहनतीने घडवलेली मुकुलजींची हस्ती म्हणजे एक अजब रसायन आहे. रंग, रस, नाद यांची त्यांची समज 'मेधावी' या बिरूदाला साजेशी आहे. नाद स्वर आणि श्रुतींचं त्यांच ज्ञान सर्वसामान्यांच्या आवाक्या पलिकडचं आहे. या माणसाचा गाण्याचा अभ्यास फक्त शब्द- सुरांच्या सुक़रेल मेळापुरतं मर्यादित नाही. त्यांच्या ज्ञानाच्या कक्षा स्वरांच्या सूक्ष्मातिसूक्ष्म फ्रिक्वेन्सिज पर्यंत विस्तारलेल्या आहेत.

तसं तर त्यांची प्रत्येक गोष्ट अंतर्बाह्य वेगळीच असते. शास्त्रीय संगीताच्या मंचावरून त्यांचा स्वर लाखांत वेगळा ऐकू येतो. तसेच शास्त्रीय संगीत आणि वाद्यांच्या संवर्धनासाठी त्यांचे संकल्पही वेगळेच. मी आणि माझं एवढी 'म' ची बाराखडी आलापणार्यांच्या दुनियेसाठी मुकुलजींचे संकल्प म्हणजे शुध्द वेडेपणाच. विशेषतः 'निश्चित स्वरसंवादाचा' त्यांचा आग्रह तर हटयोगाच्या पातळीपर्यंत जातो. ' फाईन ट्युनिंग' चा त्यांचा स्वराग्रह रसिकांनी अनेकदा अनुभवला आहे.

--

प्रिया आचरेकर

नोव्हेंबर २०१४

महाराष्ट्र टाईम्स

READ MORE

धुन सुन के मनवा

महिनाभरापूर्वीची गोष्ट. नरसोबाच्या वाडीला माघ पौर्णिमेला होणार्या कृष्णावेणी उत्सवात तसा मी काही दरवर्षी हजेरी लावत नाही. पण यावर्षी योग आला. म्हणजे आणला. कामांच्या कचाट्यातून एक दिवस मोठ्या मुश्कीलीने काढला. मुख्य उत्सवाच्या दोन दिवस आधीच पादुका आणि कृष्णावेणीचं दर्शन घ्यावं, कृष्णेच्या प्रवाहातून जमला तर थोडा उत्साह, चैतन्य शोषून घ्यावं आणि गर्दी जमण्यापूर्वी परत फिरावं असा बेत होता.

मंदिराला लागून असलेल्या धर्मशाळेत माझा मुक्काम होता.. संध्याकाळच्या कीर्तनाला जाऊन आलो होतो. रात्री पालखीला जाण्यापूर्वी थोडावेळ आराम करावा म्हणून जरा लवंडलो डोळे मिटले. खिडकीतून कृष्णेवरचा गार वारा येत होता. वाटलं, बडे गुलाम अली खाँ साहेब, गंगूबाई, मोगूबाई, किशोरी, मुकुल कोणीतरी पाहिजे आत्ता इथे. पडल्या पडल्याच गादीवर मोबाईल कुठे मिळतो का चाचपडून पाहू लागलो. माझ्या मोबाईलमध्ये हे सगळे आहेत. माझे खासम् खास दोस्तं, विरंगुळ्याची ठिकाणं, की....

--

निरंजन मराठे

मार्च २०१५

READ MORE

A Delightful Dinner of Raga

As many other music lovers do, I also keep on waiting for some good concerts. A long time entry in my wish list was a concert by Pt. Mukuls Shivputra.

In the last week of Feb, I was in Ahmedabad for some official purpose. I had been there for a conference. While going to the conference venue from our guest house, I passed by CEPT. I have a collection of around 6 recordings of Pt. Mukul Shivputra performing at CEPT. All of them are high quality audio recordings and Mukulji has sung many Ragas like Malkauns, Puriya Dhanashree, Jog, Chhayanat etc. and also has given a demonstrative talk.

While passing by, I asked my wife this many times repeated question- “When would he sing again?”

As clueless as I was, she was unable to answer. Just after reaching the venue, I got an alert from Facebook about Pt. Mukul Shivputra performing in Pune on 15th March 2015.

Though both of us were quite busy with the launch of our book, we marked the date. The occasion was Mukulji completing 60 years. The concert was to be followed by dinner.

Many music lovers and fans of Pt. Mukul Shivputra were already present, waiting for him to arrive on the stage. We could coincidentally meet renowned Tabla Player Shree Anand Badamikar during the concert.

He arrived and after some formalities, the concert began. In spite of having some issues and trouble with the sound system, Mukulji sang. Unfortunately, the concert was arranged in open lawns and another classical concert was going on in the immediately next place. In spite of all these hurdles, Mukulji took audience to a different plane.

As a policy, I avoid writing elaborately on what Ragas were sung in a concert, which Bandishes, which Talas etc. The purpose is go beyond all that and taste the environment which the artist builds in his concert. It is a precaution to ensure that reviews are not intellectual.

Pt. Mukul Shivputra opened the concert with Multani, very stirdy yet delicate. The chain went on ending with Bageshree and then Bhairavee. The music was enriching, sensitive. One of the biggest problem I see with musicians is their insensitivity. They take all the efforts to make their music wide, entertaining, intellectually compelling. All these things can be added with practice, sensitivity cannot. Pt. Mukul Shivputra won the audience and made a mark because of his sensitivity and delicacy.

Mandar Karanjkar
15 March 2015

निर्भय गान

आज अजून एक मैफल आटपून आलो. संगीत सरिता ही जरा विचित्रच. ती आपल्या मनाच्या पेल्यात पडत राहिली, की पेला भरत तर नाहीच, उलट अधिकाधिक मोठा होत जातो. हा पेला भरण्याच्या नादात, मागच्या एका महिन्यात जवळपास १० मैफिली ऐकून झाल्यात. परंतु, या पावसात राहूनही मी आपला कोरडाच. पाऊसच खोटा की काय? हा प्रश्न देखील पडतो.

याच दरम्यान, पं.मुकुल शिवपुत्रांची गानसभा आहे अशी बातमी कानावर आली. त्यांना ऐकण्याची ही माझी पहिलीच वेळ. कदाचित तहान भागणार....या आशेने मी सभागृहात पोहोचतो. आत मुसळधार पाऊस. दिव्य आणि अवर्णनीय. माझा छोटासा पेला त्या स्वरोघात भरून ओसंडून वाहू लागतो. ही कुमार गंधर्व जयंती निमित्त आयोजित बैठक. या बैठकीचा माहोल इतर बैठकिंपेक्षा फार वेगळा. मुकुलजींचे स्वर तेजस्वी प्रकाश किरणांप्रमाणे सर्वत्र भरलेले. दोन बाजूचे दोन तानपुरे म्हणजे जणू काही नाद ब्रह्माच्या दोन अविनाशी सरिता.‘या स्वरांत इतकी ताकद आणि इतके तेज कसे काय?’ या माझ्या प्रश्नाचे उत्तर देखील मला तेव्हा आणि तिथेच मिळते.

‘गुरुजी, मै तो एक निरंजन ध्यावू जी, दुजे के संग नही जावू जी’

बैठक संपली, तानपुरे खोळीमध्ये गेले. काही मिनिटांपूर्वी जादुई आणि स्वर्गीय भासणारे सभागृह आता भकास वाटत होते, जणू काही त्यातली जादूच निघून गेली होती. ही जादू म्हणजे पं. मुकुल शिवपुत्र ! पुढच्या काही महिन्यांतच मुकुलजींच्या अनेक बैठकी ऐकण्याचा योग आला आणि प्रत्येक मैफिलीत या जागुगाराची जादू अधिकाधिक मोहिनी घालत गेली. प्रत्येक बैठक चार तासांच्या वर गायली. दोनदा तर आम्हीच गाणे सुरु असताना उठून आलो, नाईलाजास्तव.

सूर्य कोटी ओतले फाटक्या झोळीत माझ्या…

कुठल्याही स्वराविश्कारात ‘स्पेस’ खूप महत्त्वाची असते. एखादा चित्रकार जेव्हा चित्र काढून रंगवतो, तेव्हा तो फुटभर कॅनवास वर अधिकाधिक ‘स्पेस’ दाखविण्याच्या प्रयत्नात असतो. विश्वाचा असीमित घेराव तो त्या मर्यादित जागेत मांडण्याचा प्रयत्न करीत असतो. गाणे देखील काहीसे असेच. स्वर, ताल, लय आणि शब्द; हे सारे मिळून एक कॅनवास बनवितात. त्यात विश्वाचा अपिरीमित घेराव कॅप्चर करणे, ही कलाकाराची किमया. सच्चा कलाकार त्याच्या स्वरांतून या अपरीमिताला साद घालत असतो. तो स्वतः हे जाणत असतोच की कितीही मोठा असला तरी कॅनवास हा तोकडाच. ही साद घालताना, तो स्वतःचे अस्थित्व देखील विसरून जातो. कलाकार अशाप्रकारे विरघळून जाताच अपरिमित त्या गाण्यात भरून येते. असं गाणं हे दोन फुटाच्या कॅनवास सारखचं; फरक एवढाच, की साक्षात अमूर्ततेने त्याला स्पर्श केला असतो. ते संगीत ऐकणारा प्रत्येक श्रोता त्या अपरीमिततेचा आणि अमूर्ततेचा साक्षी असतो. जगापलीकडे घेऊन जाणाऱ्या अशा कलाकाराचे मानावे तेवढे आभार कमीच, याची त्याला जाणीव होते. आपल्या फाटक्या झोळीत कोट्यवधी सूर्याचे तेज कलाकाराने ओतले आहे ही जाणीव त्यास होते आणि तो त्या कलाकाराचा भक्त होतो. असे असंख्य भक्त आज मुकुलजींना मनोमन दंडवत घालत असतील, या अमूर्त सोहळ्याचा साक्षी बनविल्या बद्दल.

अथांग वाटेचा वाटसरू

संगीत अथांग आहे हे आपण सगळेच लहानपणापासून ऐकत आलो अहोत. सर्व कलाकार देखील संगीत अथांग आहे असे म्हणत असतात. त्यानुसार जगतात किती हा मोठा प्रश्नच आहे. हल्ली गडबड अशी आहे, कि प्रत्येकाचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. बोलतील तसेच वागतील असे कलावंत फारच कमी उरले आहेत. वरवर स्वतःला संगीताच्या अथांग सागरातील एक क्षुल्लक घटक म्हणवून घेणारे कलाकार प्रत्यक्ष आयुष्यात त्याप्रमाणे वागतात का? हा एक प्रश्नच आहे. नवीन प्रयोग करणे, संशोधन करणे, निर्मिती करणे आणि अधिकाधिक शिकणे हे खरतर कलाकाराचे खरे जगणे. मुकुलजी आज लाखो रसिकांच्या हृदयात विराजमान आहेत, पण त्यांनी अजून शिकण्याची, नव-निर्मिती करण्याची त्यांची प्रथा अजून जपली आहे. त्यांची ही अभ्यासू आणि चिकित्सक वृत्ती बोलण्यातून आणि त्याचबरोबर त्यांच्या गाण्यातून देखील दिसून येते. मुकुलजींच्या आवाजातच एक आस आहे, स्वतःला अजून पूर्णत्वाकडे घेऊन जाण्याची. त्यांचे गाणे हे गर्वाने 'रिजिड' झालेले नाही. ते मातीच्या मऊ गोळ्यासारखे आहे. प्रगल्भ आहे आणि अजून प्रगल्भ होत आहे. त्याचा आकार आधीच सुरेख आहे व दिवस जाताहेत तसा तो अधिकच मोहक होतो आहे.

स्वरांचा शिल्पकार

चांगलं गाणं म्हणजे नक्की काय? खराब आणि चांगले संगीत यांतील फरक तो नक्की काय? अर्थात, उत्तर एक नाही, अनेक आहेत. संगीत म्हणजे एखाद्या शिल्पासारखे आहे. राग-स्वरूप हे कुशल गायक त्याच्या गळ्यातून श्रोत्यांसमोर सकारात असतो. आलाप, मग विलंबित खयाल, नंतर द्रुत, त्यानंतर एखादे भजन किंवा ठुमरी म्हणजे गाणे नव्हे. त्याचबरोबर, ताना, पलटे, हरकती आणि कसरती एवढाच गाण्याचा परीघ नाही. गाण्यात एक विचार असतो, एक दृष्टी असते. उत्तम गाण्यात सरस मांडणी असते. तो एक प्रवास असतो; गायक श्रोत्यांना आपल्या सोबत त्या प्रवाहात घेऊन चालतो. हल्ली राग अनेक गातात पण राग स्वरूप उभे राहत नाही.अनेकदा गायक गात असतो पण श्रोत्यांना ओढून नेण्याची मोहिनी त्या स्वरांमध्ये नसते. प्रत्येक रागाला त्याचा स्वतःचा गंध असतो. तो गंध आता कुठेतरी हरवतो आहे.

चराग स्वरूप उभे करण्याच्या बाबतीत मुकुलजींचा हात कोण धरणार? मुकुलजींना अनेक मैफिलींत अनेक रागांचे शिल्प कोरताना या डोळ्यांनी पहिले आहे व कानांनी ऐकले आहे. बहुतेक कलाकारांना अथक प्रयासाने एखादा राग आणि त्याचे शिल्प साकारणे साध्य होते. मुकुलजी मात्र किमायागारच! पुरिया धनश्री असो, बिहागडा असो, जोग असो, मालकौंस असो वा जयजयवंती. या व अन्य अनेक रंगांचे मुकुलजीनी उभारलेले अभिजात स्वरूप निरखणे म्हणजे रसिकांना अमृतानुभव. मुकुलजींचे गाणे म्हणजे नादब्रह्माची लूट आहे.

कबीर म्हणत असे- लूट सके तो लूट लो, राम नाम की लूट.

दर्दी मंडळीला मुकुलजी आणि त्यांच्या गाण्याबद्दल देखील असेच वाटत असणार. हृदयात मुकुलजींचं दैवी संगीत साठविण्यापलीकडे बिचारे श्रोते तरी काय करणार?

निर्भय गान सरस गान

मुकुलजींच्या गाण्यातून खरतर किती काही शिकण्यासारखे आहे. अभिजात संगीत हे नित्य-नवे असते. कुशल कलाकाराने प्रत्येक बैठकीत मांडलेला एकच राग वेगळा असतो, त्याला वेगळ्या छटा असतात. अभिजात संगीत गाणे थोडे रिस्की देखील आहे. अभिजात संगीत म्हणजे एक पलटा दोनशे वेळा घोकून श्रोत्यांसमोर गाणे अजिबात नव्हे. अभिजात संगीत हे defined नसतं. कलाकार ते श्रोत्यांसमोर define करीत असतो. त्यामुळेच, शास्त्रीय संगीत हे पाठांतरात नाही, तर ऐन बैठक सुरु असतांना जोखीम घेऊन हृदयात स्फुरणाऱ्या स्वराविश्काराला श्रोत्यांसमोर मांडण्यात आहे. सर्वच कलाकार हि जोखीम घेत नाहीत आणि त्यामुळे, अनेकवेळा गायलेले, बसवलेलेच ते श्रोत्यांसमोर गातात. संगीत स्टेजवरून define करताना, एखादा सूर नीट लागेल का ? एखादा अवघड पलटा गळ्यातून उतरेल का ? असे अनेक प्रश्न गायाकासमोर उभे असतात. मुकुलजी या सर्व प्रश्नांना न जुमानता निर्भयपणे हृदयात स्फुरणारे संगीत श्रोत्यांसमोर मांडत असतात. त्यांचे गाणे हे खऱ्याअर्थाने निर्भय आहे आणि म्हणूनच ते सरस देखील आहे.

मुकुलजींच्या गाण्याबद्दल मी काय लिहीणार? ईश्वराने त्याचे अस्तत्वच त्यांच्या गाण्यामार्फत लिहून ठेवले आहे. अध्यात्माच्या वाटेवर चालताना अन्य काही मोजक्या कालाकारांचे व मुकुलजींचे संगीत मला साथ देते आहे. अनाहत नाद मी कधी ऐकला नाही, पण मुकुलजींचा स्वर आणि त्यांच्या आवाजातील गुंज अनाहताची झलक दाखवून देतात. मुकुलजींचा आवाज आणि त्यांचे गाणे म्हणजे संगीताच्या अभ्यासकांना एक दिलासा आहे- एक खूण आहे, जी या सर्वांना अनाहताच्या दिशेने खुणावत आहे.

मुकुलजी, संगीतात आता अंधार होऊ लागला आहे. चांगले गाणे ऐकायला मिळणे फारच कठीण होऊन बसले आहे. तुमच्या सर्व बंदिशी या सर्व काळोखात ताऱ्यांप्रमाणे आहेत. तुमचे स्वर हे चंद्र-सूर्याप्रमाणे आहेत. संगीताच्या आकाशगंगेची तुम्ही शोभा आहात.

सखी मंदारवा में, आये नाही प्रीतम प्यारे।

हजारो संगीत प्रेमीच्या हृदयमंदिरात विराजमान असलेले तुम्ही प्रीतम आहात, मुकुलजी.

....मंदार कारंजकर.

READ MORE

मंतरलेल्या स्वरांगणात

दशकातून एकदाच कधीतरी उजाडणारी संध्याकाळ होती ती. खरं तर सकाळ 'उजाडते'........दिवस 'उजाडतो'.....संध्याकाळ मात्र नेहेमीच दाटून येते. पण १७ जानेवारीला मात्र मुंबईत एक संध्याकाळ चक्क 'उजाडली'.... लखलखली.....फुलली..... मोहरली सुगंधित झाली. या संध्याकाळला गंधर्वस्वरांचा स्पर्श आणि सोनचाफ्याचा सुवास लाभला होता.

त्या रविवारी मुंबईच्या अथांग समुद्रात सूर्य संध्यास्नानासाठी उतरला तेव्हा मरीन ड्राईव्ह परिसरातल्या एन्.सी.पी.ए. च्या आवारात कानसेन रसिकांची गर्दी जमू लागली होती. पं. मुकुल शिवपुत्रांच्या मैफिलीचा हा मणिकांचन योग 'टच' या एन्.जी.ओ. ने जुळवून आणला होता. रस्त्यावरच्या अनाथ मुलांना एक उज्वल भविष्य देण्यासाठी गेली सत्तावीस वर्षे काम करणारी संस्था 'टच' व फक्त पं. मुकुल शिवपुत्रांच्या स्वास्थ्य व स्वप्नपूर्तीचे व्रत घेतलेली संस्था 'गंधर्वसभा' यांच्या संयुक्त विद्यमाने आखली गेलेली 'गंधर्वटच' ही मैफिल गेल्या पाच वर्षातल्या मुकुलजींच्या एकाहून एक सरस परफॉर्मन्स पैकी सर्वात सुंदर मैफिल ठरली.

-

प्रिया आचरेकर

जानेवारी २०१६

READ MORE

मी तो यात्रिक

संगीतानं जसं सर्वसामान्यांचं आयुष्य समृध्द होत असतं, तसंच संगीतात सर्वस्वानं प्राणतत्व फुंकून ते पेश करणार्यांचही होत असतं. पं मुकुल शिवपुत्र भानुमत्येय यांच गाणंही याला अपवाद नाही. त्यांची विलक्षण गायकी अन् अलौकिक आहे. परिसस्पर्शी आहे. या लोकोत्तर गायकानं त्याच्या साठीनिमित्त केलेलं हे मुक्तचिंतन......

-

प्रिया आचरेकर

२५ मार्च २०१६

लोकसत्ता


विचक्षण कलावंत

मुकुलजींच्या ठायी हे सारे गुण स्पष्टपणे दिसून येतात. काळाची पावले ओळखणाऱ्या आणि सर्जनाची अचाट ताकद असलेल्या या कलावंताला आजवरच्या आयुष्यात संगीताच्या दरबारात जे काही निर्माण करता आले, त्याची ओळख त्यांच्या कलेला सामोरे गेलेल्यांना निश्चितच असेल. त्यांच्यातील सर्जनशीलतेने आणि प्रतिभेने त्यांना अनेकदा आपल्या गुरुच्याही पुढे जाण्याचे बळ दिले....
-

मुकुंद संगोराम
लोकसत्ता

२५ मार्च २०१६

READ MORE

On his 60th birthday

On his 60thbirthday. Pandit Mukul Shivputra spoke to Jaydev Calamur about lessons learnt, the future of Hindustani classical music, the search for a student to carry on his legacy and his father, Pandit Kumar Gandharva. Excerpts...

--

Jayadev Calamur

READ MORE

Nirjar Swaradhara

First Part

Second Part

निर्जर स्वरधारा

किशोरीजी गेल्या,सर्वांना दुःख झाले. त्यांनी जे ऐकविले, जी अभिव्यक्ति केली ती आम्हां सर्वांच्या मन-मानसात कायम असणार आहे, ती सतत राहणार आहे. त्यांच्याच पीढ़ीतले दिवंगत बुज़ुर्ग जसे वसंतराव देशपांडे,बाबूराव रेळे,कुमार गंधर्व या सर्वांत एक साम्य होते की ही सर्व मंडळी केवळ ऐकविणारी, फक्त अभिव्यक्ति करणारीच नसून आस्थेने ऐकणारी ही होती. त्यांची अभिव्यक्ति तर आमच्या स्मृतीत कायम आहे, ध्वनि-मुद्रित देखील आहे पण कौतुकाने ऐकणारे ते कान आता राहिले नाहीत- हे दुःख विशेष आहे.
आमच्या प्रयत्नांचे हे सर्व साक्षीदार होते. त्या मालिकेतला आणिक एक मणि नुकताच पलीकडे गेला.

-मुकुल शिवपुत्र

Loksata Epaper Link